अंतिम लढतीपूर्वी जो फिजियनने अंगठा मिठाच्या गरम पाण्यात रात्रभर ठेवला व बधिर केला. त्याने घेतलेल्या मेहनतीला फळ मिळाले. मुष्टियुध्दाचा बादशहा मोहम्मद अली सोबत जो ची १९७१ ची लढाई खूप गाजली. जो ते मुष्टियुध्द जिंकला आणि जगज्जेता म्हणून प्रसिध्दीस आला.
असे म्हटले जाते की, काळ गोष्टींना बदलवतो; परंतु खरी गोष्ट तर ही आहे की, तुम्हीच त्या बदलांसाठी कारणीभूत असता. ज्यांना बघण्याची दृष्टी आहे, त्यांच्यासाठी सर्व जगच सुंदर आहे. ज्यांचे विचारच मळकट असतात, त्यांना जवळचा मित्रपरिवारही संशयास्पद वाटायला लागतो. म्हणूनच सुंदरता जेवढी रहस्यमय, तेवढीच भीतिदायकही आहे. ही ईश्वर व सैतान यामधील अशी लढाई आहे की, जी माणसाच्या ह्रदयाच्या मैदानावर लढली जाते.
विचारांना नियंत्रित करून आपली क्षमता वाढवता येते, असे म्हणणारा अॅरिस्टॉटल या विचारवंत शास्त्रज्ञाने विचारांना नियंत्रित करण्याच्या पध्दतीही सांगितल्या. सामान्य माणसालाही असामान्य बनण्याचे वेध लागले आहे, तो त्यासाठी धडपडतोय. आजचा तरुण वर्ग तर फार उत्साही आहे. त्याला यश पाहिजे आहे. याच तरुण वर्गावर विचारांचे सुसंस्कार करण्याचे कार्य या स्तंभातून होत असते. विचार जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतात. चांगल्या वाचनाने विचारांना दिशा मिळते. मोठी स्वप्नं त्या विचारांतून दिसायला लागतात आणि कालांतराने ती प्रत्यक्षात उतरायला लागतात.
वाचन माणसाला केवळ विचारांनीच समृध्द बनवते असे नाही, तर ते संपत्तीनेसुध्दा मालामाल करते. जगातील सर्वांत श्रीमंत असलेले बिल गेट्स यांनासुध्दा वाचनाचे वेड आहे.
वर्तमानासोबतच भविष्यावर लक्ष केंद्रित करणा-या आणि स्वप्नांना ध्येयात बदलून अहोरात्र कार्य करणा-या बिल गेट्सची ‘अॅट द स्पीड थॉट्स’ आणि ‘द रोड अहेड’ ही दोन पुस्तके जगभर प्रसिध्द आहेत. त्यांच्या ग्रंथालयात १५,००० पेक्षा अधिक पुस्तके संग्रही आहेत. अझीम प्रेमजीसुध्दा पुस्तके वाचण्यासाठी वेळ काढतात. वाचनासाठी व आत्मचिंतनासाठी वेळ काढला पाहिजे, असे ते आवर्जून सांगतात. भारतातील सर्वांत श्रीमंत स्त्री तथा भारतीय बायोटेक्नॉलॉजीच्या सम्राज्ञी किरण मुजुमदार या आपल्या यशात व्यवस्थापनाच्या, तसेच आत्मचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा सहभाग असल्याचे म्हणतात. धीरूभाई अंबानी यांनी ३० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी केली आणि पुढे ते पेट्रोलियमच्या खाणीचे मालक झाले. भारतीय अब्जाधीशांमध्ये अग्रस्थानी राहिलेले धीरूभाई म्हणतात, मी मोठे विचार करू शकलो, मी मोठी स्वपने पाहू शकलो कारण, मी चांगली पुस्तके वाचली. आदित्य बिर्ला यांनाही पुस्तकांचे वाचन करणे आवडते. सुप्रसिध्द उद्योजक वेणुगोपाल धूत यांचे लेख नियमितपणे प्रादेशिक वृत्तपत्रांत प्रसिध्द होत असतात. त्यांच्या लेखात केवळ उद्योगविषयीच माहिती नसते, तर भगवद्गीता, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, अशा विविध पैलूंवर ते प्रकाश टाकतात.
चांगले वाचन माणसाला चांगल्या विचारांनी समृध्द बनवते. सामान्य गुणांना असामान्य शक्तीत परिवर्तित करण्याची ताकद वाचनात असते. यासाठी एक वास्तविक गोष्ट येथे सांगतो. जागतिक मुष्टियुध्द योध्दा जो फ्रिजियन अलीकडेच कॅन्सरने मरण पावला. सुवर्ण जिंकणारा जो फ्रिजियन खरे तर स्पर्धक नव्हताच; तो राखीव खेळाडू होता. मुख्य खेळाडूला इजा झाल्यामुळे जो याला संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. अंतिम लढतीपूर्वी जो फ्रिजियनने अंगठा मिठाच्या गरम पाण्यात रात्रभर ठेवला व बधिर केला. त्याने घेतलेल्या मेहनतीला फळ मिळाले.
मुष्टियुध्दाचा बादशहा मोहम्मद अलीसोबत जो ची १९७१ ची लढाई खूप गाजली. तो ते मुष्टियुध्द जिंकला आणि जग’ज्जेता म्हणून प्रसिध्दीस आला. जो हा गरीब कुटुंबात जन्मलेला होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याच्या सुरुवातीच्या आयुष्यातील प्रवास अंगावर काटे आणणारा राहिला; परंतु जो ने माघार घेतली नाही. तो एक-एक पाऊल पुढे टाकत गेला आणि यशस्वीही ठरला.
जो फ्रिजियनच्या जीवनाविषयी माहिती वाचून सामान्यातील सामान्य तरुणालाही स्फूर्ती येईल. कठीण परिस्थितीत जो यश मिळवू शकला, तर आपण का नाही, ही कल्पनाच आपले व्यक्तीमत्त्व बदलवण्यासाठी कारणीभूत ठरेल. मेहनतीला पर्याय नाहीच. मेहनत करण्याची, यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकाची असते; परंतु एखाद-दोन वेळा अपयश आले की, माघार घेणा-यांची संख्याही खूप असते. अशांना प्रेरणा देण्याचे कार्य सकारात्मक विचारच देत असतात. या सकारात्मक विचारांचा जन्म चांगल्या वाचनातून होत असतो. वाचन मनुष्याचे विचार, आचार, जीवन सर्वच बदलवून टाकते. ती एक अशी प्रेरणा निर्माण करते, जी तुम्हाला सातत्याने कार्य करण्याचे इंधन पुरवत असते. यशाच्या कल्पनेपेक्षा अपयशाच्या भीतीला दूर करण्याचे कार्य करते. पहिले पाऊल टाकण्याची प्रेरणा देते. पहिले पाऊल पडले की, दुसरे पाऊल ठेवण्याची, दुसरे टाकले की, तिसरे पाऊल टाकण्याची जागा मिळते आणि सातत्याने एक-एक पाऊल पुढे पडत जाते.
Featured Image Creator: Newsday LLC | Credit: Newsday RM via Getty Images
( Visit SanjayNathe.com for more articles )
Nice post. I learn something new and challenging on sites I stumbleupon everyday. Its always interesting to read content from other writers and practice a little something from their sites.
Everything is very open with a really clear description of the issues. It was definitely informative. Your site is useful. Thank you for sharing!