चांगल्या गोष्टींची केलेली तुलना तुमच्यासाठी प्रोत्साहनही ठरू शकेल. परंतु बरेचदा तुलना केल्याने न्युनगंडही निर्माण होऊ शकतो. तुलना करणारा संशोधक वृत्ती गमावून बसतो. नवनवीन कल्पनेशिवाय यश मिळविणे अवघडच. त्याच त्या बाबी, रूटीन असलेले काम आव्हाने निर्माण करीत नाहीत.
Beautiful Tomorrow never comes, When ot comes it’s already today! In hunt of beautiful Tomorrow Let us not waste the wonderful Today..
“उद्याचा चांगला दिवस कधी उगवतच नाही. जेव्हा तो येतो तो आज असतो. चांगल्या उद्याच्या शोधात आज गमावू नका.”
विनोबाजींची एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते. पवनार आश्रमातून ते सुरगाव या गावी रोज भंगीकामासाठी जायचे. संपूर्ण वर्षभरात ते तीन-चार दिवस कामाला जाऊ शकले नाहीत. विनोबाजींना याची सारखी रुखरूख वाटायची. ती अस्वस्थता त्यांनी निकटच्या सहका-यांजवळ व्यक्त केली. सहकारी म्हणाले, Óवर्षभरात तीन-चार दिवसांचा खंड म्हणजे काय खंड झाला. शाळेतील शिक्षकांना रविवारची सुट्टी, शनिवारची अर्धी सुट्टी, दसरा, दिवाळी, नाताळच्या मोठ्या सुट्ट्या निराळ्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या परत वेगळ्या. वर्षभरात ते केवळ आठ नऊ महिने काम करतात. त्या तुलनेत आपल्यासारख्या समाजशिक्षकाने वर्षभरात केवळ तीन-चार सुट्ट्या घेतल्या तर त्यात खटकण्यासारखे आहे तरी काय?Ó विनोबा म्हणाले, Óशिक्षक हा माझा आदर्श आहे का? त्यांच्या सुट्ट्यांचे उदाहरण देऊन माझ्या तीन-चार दिवसाचे समर्थन कसे काय होऊ शकतं!Ó
आज मला काय करायचे, हा विचार सोडून दुस-याशी तुलना करण्यात आपल्याला अधिक चांगले वाटते. मी काय करायला हवे, यावर आत्मचिंतन करण्याऐवजी दुस-याच्या तुलनेत मी कसा चांगला आहे, यावरच आपले लक्ष अधिक असते. यशस्वी होण्यासाठी तुलनात्मक विचार केला तर काही हरकत नसावी, परंतु आजूबाजूच्या बायकांपेक्षा माझी बायको सुंदर आहे म्हणून स्वत:ला धन्य समजणा-या महापुरुषाला मेहनतीचे, सातत्याचे पर्यायाने यशाचे तुलनात्मक महत्त्व समजावून सांगणे किती अवघड ठरेल ! चांगल्या गोष्टींची केलेली तुलना तुमच्यासाठी प्रोत्साहनही ठरू शकेल, परंतु बरेचदा तुलना केल्याने न्युनगंडही निर्माण होऊ शकतो. तुलना करणारा संशोधक वृत्ती गमावून बसतो. नवनवीन कल्पनेशिवाय यश मिळविणे अवघडच. त्याच त्या बाबी, रुटीन असलेले काम आव्हाने निर्माण करीत नाहीत. पर्यायाने आपला यशाचा आलेख तुलनात्मक घसरत जातो. जगातील बदलाशी स्पर्धा करण्याची कुवत राहत नाही म्हणून आपण नेहमी पर्यायाच्या शोधात असलो पाहिजे. जोपर्यंत निश्चित असा योग्य पर्याय सापडत नाही तोपर्यंत नेहमीचाच मार्ग धरावा, परंतु तो कायमस्वरूपी नसावा.
मेहनतीला पर्याय नसतो आणि नेमकी हीच गोष्ट लोक विसरतात. स्वप्न सत्यात आणण्यासाठी मेहनतीची गरज असते. आपण नेहमी नवनव्या गोष्टींचा विचार करायला हवा. प्रत्येकाने नव्या गोष्टी शिकणे, त्याचे कृतीत रूपांतर करणे ही क्षमताच स्पर्धेच्या युगात महत्त्वाची आहे. बदलांना आनंदाने सामोरे जा. बाह्यजगापेक्षा तुमच्या बदलाचा वेग कमी असेल तर तुमचा अंत जवळ आला आहे, असे समजा. योग्य रस्ता कधीच तयार नसतो, तो शोधावा लागतो. तुमच्या भोवतीची सगळी माणसं एखादी गोष्ट अशक्य आहे, असं सांगत असतात तेव्हा एक पाऊल मागे जा आणि विचार करा. तुम्हाला ती गोष्ट शक्य होईल. तुमच्या कामाला जोवर तुम्ही तुमच्यातील सर्वोत्तम देत नाही तोवर तुम्ही सर्वोत्तम बनू शकत नाही. तुमच्या अंत:प्रेरणेचा नेहमीच आवाज ऐका, तुम्हाला काय हवे ते त्यालाच माहिती आहे. तुमचं काम चांगलं करायचं असेल तर त्यावर प्रेम करा. स्वत:ला नेहमी सुधारत राहिले पाहिजे, तरच तुम्ही प्रगती करू शकाल. वाईट परिस्थिती तुम्हाला कधी हरवू शकत नाही. तुम्हीच तुम्हाला हरवू शकता. जगात अशक्य असे काही नसते. फक्त आपल्या मनाला ते पटले पाहिजे.
(Visit SanjayNathe.com for more articles)
Really motivational and inspiring and practicly proved words. I will change my work style.