कार्यक्षम व्यक्तिमत्त्व

विद्यार्थ्‍यांनी तर विद्यार्थी जीवनापासून स्वत:ला चांगल्या कामाची, उत्तम मित्रत्वाची सवय लावून घ्यावी. दिवसातून शक्य तितक्या अधिक वेळा ‘मला जिंकायचे आहे, माझा जन्मच यश मिळविण्यासाठी झाला आहे’ असे स्वत:शीच बोलावे.

आलस्येनं गतं दीर्घ जीवितं न हि जीवितम् ।

क्षणमेकं  सुयत्नेन यो जीवती स जीवती ।।

अर्थात, “आळसात गेलेले आयुष्य दीर्घ असले तरी सफल नसते. एक क्षण का होईना, पण चांगला प्रयत्न करून जो जगतो, तोच ख-या अर्थाने जगतो.” बरेचदा आपण वायफळ गप्पा करण्यात वेळ घालवितो, त्यावेळेस महत्त्वाचे काम असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही चर्चा महत्त्वपूर्ण असतात, तर काही आनंददायी असतात. आनंदासाठी घालविलेल्या वेळेची गणती वाया घालविलेल्या वेळात करता येत नाही. जीवनात काही मिळवायचे असल्यास आपल्याला वेळेची किंमत समजलीच पाहिजे. वेळेचे नियोजन करून, आळस झटकून त्या नियोजनावर अंमलबजावणीही झाली पाहिजे. आपल्या अपयशाला दुसरा कोणी जबाबदार नसतोच, त्याला आपण स्वत:च जबाबदार असतो. हे सर्व अपयश आळसामुळे आलेलं असते. विद्यार्थ्‍यांनी तर विद्यार्थी जीवनापासून स्वत:ला चांगल्या कामाची, उत्तम मित्रत्वाची सवय लावून घ्यावी. दिवसातून शक्य तितक्या अधिक वेळा ‘मला जिंकायचे आहे, माझा जन्मच यश मिळविण्यासाठी झाला आहे’ असे स्वत:शीच बोलावे. आळस केल्याने चिंता वाढते, नवीन ज्ञान मिळविण्यात अडथळे येतात, शरीराची स्थुलता वाढते, तणावामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. शिवाय, समाजमान्यताही मिळत नाही. म्हणून आळस झटका. निसर्गाला गती प्रिय आहे. थांबलेले पाणीसुद्धा काही दिवसाने पिण्यायोग्य राहत नाही, तसेच थांबलेल्या मनुष्याचेही असते. म्हणून थांबू नका, कार्य करा, अविरत कार्यशील राहा. तुमच्या कार्यशीलतेने तुमचेच विश्व विस्तारणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमची कार्यशीलता इतरांसाठी प्रेरणा ठरावीशी असे तुमचे कार्य व्हावे. तुमच्या गोष्टींवर, तुमच्या व्यक्तिमत्त्वावर इतरांना विश्वास असावा. लक्षात ठेवा, तुम्ही जे बघता ती गोष्ट म्हणजे कला नव्हे, तर तुम्ही जी गोष्ट इतरांना बघायला सांगता, ती गोष्ट म्हणजे कला होय.


(Visit   SanjayNathe.com   for more articles)

1 thought on “कार्यक्षम व्यक्तिमत्त्व”

Leave a Comment