एकदा संत कबीरांना त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला, Ó बाबा, तुम्ही गेल्या तीन महिन्यापासून आम्हाला शिकवायला का येत नाहीत?Ó संत म्हणाले, मी स्वत:च शिकत आहे, स्वत:वर नियंत्रण मिळविणे किती अवघड आहे हे मला या तीन महिन्यात जेवढे कळले तेवढे यापूर्वी कधी कळले नव्हते.
सुप्रसिद्घ प्रवासी इब्नबतूआ यांच्या अनेक रोचक, माहितीपूर्ण आणि अनुभवसंपन्न गोष्टी सांगितल्या जातात. त्यांनी तरुणपणातच एक शपथ घेतली होती की, Ó’या रस्त्याने मी एकदा गेलो असेल त्याच रस्त्यावरून मी पुन्हा जाणार नाही.Ó त्यानंतर सुमारे चाळीस वर्षे त्यांनी जगाचा प्रवास केला, परंतु तो पुन्हा त्याच रस्त्याने कधीच गेला नाही. त्याच काळात दळणवळणाची साधने वाढली होती, त्यामुळे आशियाचा युरोपाशी आणि युरोपचा आफ्रिका खंडाशी सहजासहजी व्यापार होत असे. चीनसारख्या देशाने या व्यापारी साधनांचा मोठ्या खुबीने वापर करून रेशीम उत्पादनात जगात आघाडी घेतली. युरोपियन लोकांत रेशमला मोठ्या प्रमाणात मागणी होती. विशिष्ट झाडाच्या खोडापासून किंवा पानापासून रेशीम तयार होत असावे, असा त्यांचा समज होता. रेशीम कशापासून बनते, हे चिन्यांनीही कधी माहिती पडू दिले नाही. त्याच काळात प्लेगची साथ आली आणि जगातील सुमारे वीस टक्के जनता त्या प्लेगमध्ये मारली गेली. मोठी शहरे तर जवळपास नष्टच झालीत. प्लेग एका राष्ट्रातून दुस-या राष्ट्रात पसरू शकला कारण त्याच वेळी दळणवळण वाढले होते. व्यापार तेजीत होता. तेव्हा मात्र लोकं का मरत आहेत, हे समजण्याच्या आतच समजून घेण्याचा प्रयत्न करणाराही प्लेगच्या संपर्कात येऊन मरून जायचा. प्लेग पसरला नाही तो वाळवंटी भागात. उच्च तापमानात प्लेगचे जंतू जगू शकत नव्हते. नेमक्या प्लेगच्या महामारीच्या वेळी इब्नबतूआ हा सहारा वाळवंटातून मार्गक्रमण करीत होता. सुमारे अमेरिकेच्या क्षेत्रफळाएवढे क्षेत्रफळ असलेले सहारा म्हणजे त्याकाळी कर्दनकाळच होते. रस्ते नाहीत, पाणी नाही, वाहने नाहीत, अशा काळात सूर्य आणि हवेच्या वाहण्याने दिशा ओळखून प्रवास करणे आणि सहाराच्या एका टोकावरून दुस-या टोकापर्यंतचा हजारो किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करणे, ही सामान्य बाब नव्हती. सतत चार महिन्यांच्या प्रवासानंतर इब्नबतूआ ने लोकवस्तीत प्रवेश केला. सहाराचे रौद्र रूप आणि प्लेगचे भयानक स्वरूप या दोन्हीचे वर्णन त्यांनी जिवंत रेखाटले आहे. सोबत जागतिक विविधतेचे सर्वप्रथम वर्णन त्यानेच केल्याचे सांगितले जाते.
सलग चाळीस वर्षांचा प्रवास आणि तोसुद्घा नवनवीन व खडतर मार्गाने हे काही असामान्य नव्हते, पण यात काही विशेष नव्हते, असे करणे कोणालाही शक्य आहे. जर तुमच्यात शिस्त, चिकाटी आणि एकाग्रता असेल, तर तुम्ही यापेक्षाही भव्य-दिव्य यश संपादन करू शकता, असे इब्नबतूआ लिहितो. अर्थातच, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास या त्रिसूत्रींचा उपयोग होणारच. यातील पहिले सूत्र आहे Óशिस्तÓ. जीवनात कोणतेही काम करायचे असल्यास त्याला शिस्त असणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्या दिवशी दहा-बारा तास काम करायचे आणि सात-आठ दिवस मग त्या कामाकडे ढुंकूनही पाहायचे नाही, अशा पध्दतीने काम केल्यास ते काम पूर्णत्वास जाणार नाही. रोज थोडा वेळ पण सातत्यपूर्ण कार्य करणे गरजेचे असते. यासाठीच शिस्त आवश्यक असते. शिस्त नसेल तर वेळेचे नियोजन शक्य नसते. जे शिस्तीने चालतात त्यांची सुरुवातीला चेष्टा होत असली तरी अंतिमत: तेच यशस्वी ठरत असतात.
दुसरे सूत्र आहे ÓचिकाटीÓ. अपयश मिळाल्यानंतरही जो हाती घेतलेल्या कामाला सोडत नाही, ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला चिकाटी म्हणतात. नवनवीन संशोधन करतांना शास्त्रज्ञांना अनेकदा अपयश येते, परंतु ते आपले प्रयत्न सोडत नाहीत व एक दिवस अंतिम ध्येयापर्यंत पोहोचतात. यासंदर्भात कोळयाचे उदाहरण अतिशय उद्बोधक ठरते. एखाद्या ठिकाणी जाळे विणायला कोळी सुरुवात करतो. अनेकदा त्याचे जाळे तुटते, पण तो पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करतो. खूप प्रयत्न केल्यावर ते जाळे पूर्ण होते खरे, पण बरेचदा त्याच्यातच अडकून कोळी मरतो. या मरण्याची कल्पना असूनही कोळी प्रयत्न सोडत नाही. मग काम करायला घेण्याअगोदरच अपयश मिळेल, या भीतीनेच जर तुम्ही कामाला सुरुवातच करीत नसाल तर यश कसे मिळेल. मिळणारे अपयशच जर यश मिळण्याची नांदी ठरणार असेल, तर चिकाटीने यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आपले काम असते. म्हणून अडचणींना सोडवायचे असते, घाबरायचे नसते.
यशाच्या त्रिसूत्रीतले सर्वात शेवटचे सूत्र म्हणजे Óएकाग्रताÓ. मनाला एकाग्र ठेवणे ही सामान्य बाब नाही. एकदा संत कबीरांना त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला, Óबाबा, तुम्ही गेल्या तीन महिन्यापासून आम्हाला शिकवायला का येत नाहीत?Ó संत म्हणाले, Óमी स्वत:च शिकत आहे, स्वत:वर नियंत्रण मिळविणे किती अवघड आहे, हे मला या तीन महिन्यात जेवढे कळले तेवढे यापूर्वी कधी कळले नव्हते. सध्या मी एकच काम करतोय स्वत:वर नियंत्रण मिळविण्याचे, स्वत:ला एकाग्र करण्याचे.Ó खरंच, मन फार चंचल असते. त्याच्या प्रचंड वेगाचा आपण विचारही करू शकत नाही. त्याला स्थिर ठेवणे ही एक कला आहे. आपले मन, आपली बुध्दी आणि आपले शरीर या तिन्हींची एकाग्रता झाली, तरच कोणत्याही क्षेत्रात आपण सर्वश्रेष्ठ ठरू शकतो.
एकाच रस्त्याने पुन्हा जाणार नाही, असे म्हणणा-या आणि जीवनभर ते पाळणा-या इब्नबतूआचे जीवन आणि आपले जीवन यात थोडीशी तुलना करून पहा. आपला दररोज सकाळी फिरण्याचा रस्ता, शाळा-कॉलेजमध्ये जाण्याचा रस्ता, एवढेच कशाला घराकडे जाण्याचा रस्ताही आपण कधी बदलत नाही. आपल्या जीवनात तोच-तो पणा अधिक असतो, आपण स्वत:हून ते बदलण्यास इ’छुक नसतो. जोपर्यंत आपण स्वत:हून काहीतरी नवीन करण्यास इ’छुक नसतो तोपर्यंत कोणीही आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकत नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मी सर्वश्रेष्ठ ठरावे, किमान एवढा प्रयत्न तरी विद्यार्थीदशेत होणे म्हणूनच गरजेचे वाटते.
( See SanjayNathe.com for similar articles .)
I want to to thank you for this good read!! I certainly loved every little bit of it. I have you bookmarked to look at new things you postÖ