सरकारी नोकरी मिळवणे म्हणजे फक्त एक नोकरीची मिळकत नाही; हे आपल्या अंतर्मनातील संघर्ष, स्वप्नांची ओढ आणि अपयशातून शिखर गाठण्यासाठी केलेल्या अमर्याद मेहनतीचे फळ असते. ध्येय निश्चिती करून ते सत्यात उतरविण्यासाठी घेतलेल्या प्रत्येक श्वासात जे सामावलेलं असतं ते प्रत्यक्षात उतरलंय हेच त्याच्यासाठी ‘अद्भुत यश’ ठरतंय! हे यश केवळ आर्थिक सुरक्षितता देत नाही, तर आत्मविश्वासालाही बळकट करते.
विद्यार्थी जीवनातील चंचल बुद्धी आणि ध्येय निश्चितीचे आव्हान | Restless Mind and the Challenge of Goal Setting in Student Life
विद्यार्थी दशेत बुद्धी जेवढी तीक्ष्ण असते तेवढीच ती चंचलही असते. कारण बुद्धीला हवं तेवढं खाद्य मिळत नाही त्यामुळं ती सतत नवनवीन कल्पना, स्वप्न, उत्साह, उत्सुकता अशा अस्थिरतेच्या मिश्रणात हिंदोळे खात असते. त्यामुळे आपल्या मेंदूच्या सृजनशील शक्तीला पोषक वातावरण मिळवून देणं ही आपली जबाबदारी असते. यासाठी विद्याथ्र्यांनी स्वत:च पुढाकार घेणं अपेक्षित असतं.
मात्र अलीकडे इंटरनेटमुळं माहितीच्या अनंत सागरात विद्यार्थी अनेक विषयांमध्ये रस दाखवतो. त्याला आभासी, काल्पनिक जगात आणि वास्तविक जीवनातील सीमारेषा ठरवण्यात अडचणी येतात. सोशल मीडिया, इंटरनेटवरील माहितीच्या महासागरात आणि सतत मिळणाऱ्या नवनवीन अपडेट्समुळे तो विचलित होतो. ही चलबिचल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते की स्वत: ठरवलेला उद्देश सातत्यानं बदलत असतो. आज तो आयएएस व्हायचं ध्येय ठरवतो आणि सहा महिन्यांनी तो वेगळंच काहीतरी करण्याचा विचार करायला लागतो. त्याच्या या अस्थिर मनाचा त्याच्यावर तर ताण येतोच शिवाय त्याच्या अशा वागण्याने कुटुंबातील सदस्यसुद्धा हैराण होतात.
ध्येय बदलामागील कारणे: सोशल मीडियाचा प्रभाव | Reasons Behind Changing Goals: The Impact of Social Media
असं का होतं? सोशल मीडिया सतत ‘नवीन’ गोष्टी प्रदान करतं आणि अनेकदा व्हायरल होणा:या ट्रेंड्स, प्रेरणादायी पोस्ट्स किंवा सेलिब्रिटीच्या यशाच्या कहाण्या विद्याथ्र्यांच्या मनात तात्पुरता उत्साह निर्माण करतात. या तात्पुरत्या प्रेरणांनी ते आपले मूळ ध्येय विसरून नवनवीन उद्दिष्टे ठरवण्याचा प्रयत्न करतात. आपण काहीतरी वेगळं करून दाखवू ही त्यामागची प्रेरणा असते. त्यामुळे ते मूळ ध्येयावर फोकस करू शकत नाहीत.
जेव्हा विद्यार्थी आपल्या मूळ उद्दिष्टापासून विचलित होतात, तेव्हा त्यांना वाटू लागते की दुसरे ध्येय अधिक साध्य व आकर्षक असतील. म्हणून सतत ध्येय बदलणे हा एक प्रकारचा बचावात्मक (Defensive) मानसशास्त्रीय प्रतिक्रिया बनते. सोशल मीडियावरील अल्पकालीन माहिती मिळाल्याने मेंदूत दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक ती पोषणरूपी माहिती कमी मिळते. या कारणाने विद्याथ्र्यांच्या शिक्षणात आणि ध्येय निश्चिती प्रक्रियेत सतत बदल घडून येतात. ध्येय निश्चितीबद्दल अधिक वाचा.
अस्थिर ध्येयांचे परिणाम आणि संवादाचे महत्त्व | Consequences of Unstable Goals and Importance of Communication
परिणाम: मुळात अस्थिरता हीच तणावाला कारणीभूत ठरते. ज्यांची ध्येये स्पष्ट नसतात ते तर विचलित असतातच शिवाय त्यांच्या अस्थिर भूमिकेमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा काळजीत पडतात. विद्याथ्र्यांनी याबाबत पालकांसोबत खुलेपणाने संवाद साधायला हवा असतो. नेमकं तेच होत नाही.
विद्यार्थी एकतर्फी निर्णय घेतात. पालकांना याबाबतीत काही समजत नाही असा त्यांचा समज असतो. मुळात पालक आपल्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत, किमान ते योग्य सल्ला देऊ शकतात, एवढं भानही विद्यार्थी ठेवत नाहीत. यातून घरात अस्वस्थता, वादावादी आणि याचे रूपांतर अबोला होण्यात होते. जिथे संवादच नसेल तिथे प्रश्न अधिक चिघळतात. यात विद्याथ्र्यांच्या करिअरवरच प्रश्न निर्माण होतात. अभ्यासावर परिणाम होतो. अनेक विद्यार्थी नकळत निराशेत ढकलले जातात. मनाच्या या प्रचंड वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनाचा प्रचंड वेग या लेखाचे वाचन उपयुक्त ठरू शकते.
ध्येय निश्चितीसाठी प्रभावी उपाययोजना | Effective Measures for Goal Setting
उपाय कोणते? सोशल मीडियावर बघितलेली माहिती आणि त्यातून निर्माण झालेली अवास्तविक स्वप्ने आपल्या क्षमतांपेक्षा जास्त आहेत याची कल्पना झाल्यावर विद्यार्थी तुलनात्मक सुलभ ध्येय निवडण्याचा प्रयत्न करतो आणि स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतो. खरं तर ही चांगली गोष्ट असते. मात्र तो आपला स्वभाव आणि सवयी मात्र बदलत नाही. त्याने स्वत:च्या सवयींमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करायला हव्यात. यासाठी, चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- सोशल मीडिया आणि इंटरनेटपासून दररोज ठराविक वेळ स्वत:ला दूर ठेवावे. यामुळे मनाची विचलितता कमी होते आणि ध्येय निश्चिती अधिक स्पष्ट होते.
- पुस्तक वाचनाला प्राधान्य द्यावे. पुस्तके सर्जनशीलता आणि एकाग्रता वाढविण्यास सहायक ठरतात. जीवनाच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा पुस्तकांतूनच मिळते.
- प्रस्तुत साप्तहिकातील संपादकीय पान अवश्य वाचावे. साप्ताहिकातील वाचन मेंदूला प्रोत्साहित करते आणि सिद्धतेला आधार देते.
- कुटुंबातील सदस्य, शिक्षक, अनुभवी मार्गदर्शक यांच्याशी संवाद ठेवावा. त्यांचे अनुभव, मार्गदर्शन शांततेने आणि काळजीपूर्वक ऐकून घ्यावे. यातून यशाचे गुपित उघड होते. यशाचे गुपित जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा.
- शारीरिक व्यायाम, कलात्मक क्रियांमध्ये सहभाग वाढवावा.
- प्रेरणादायी कार्यशाळा, सेमिनार यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवावा. तसेच, प्रस्तुत साप्ताहिक वाचणा:यांचा ग्रुप तयार करून त्यात दिलेल्या सकारात्मक लेखांवर सकारात्मक चिंतन आणि चर्चा करावी.
विद्यार्थी जीवनातील चंचल बुद्धी ही नित्य नवीन कल्पनांची झलक असली तरी, योग्य वेळापत्रक, ध्यान, डिजिटल विश्रांती, व्यायाम आणि सकारात्मक संवादाद्वारे ती सकारात्मक दिशेने वळवता येते. या उपायांनी विद्यार्थी आपल्या ज्ञानाला सुसंगत रूप देऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा यशाचा मार्ग खुला होतो. यशासाठी शिस्त किती महत्त्वाची आहे, हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.