आत्मचिंतन: चांगलं की वाईट? | Self-Reflection: Good or Bad?

चांगलं की वाईट? | Good or Bad?

हे तुम्ही ठरवावं. ‘जगात चांगलं किंवा वाईट असं काहीही नसतं. तुम्ही घडलेल्या घटनांवर कशी प्रतिक्रिया देता त्यावर सर्व अवलंबून असतं,’ असं विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) म्हणाले होते. प्रत्येकाचं आपलं एक तत्त्वज्ञान असतं जे भूतकाळातील अनुभवातून मिळालेलं असतं. त्याची सत्यता पडताळून पाहण्याची तयारी मात्र फार कमी लोक घेतात. यावर आत्मचिंतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

शहरातील पॉश वस्तीला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला जिथे कचरा टाकल्या जायचा अगदी तिथेच एक हातठेला लागायचा. या हातठेल्यावर कांदेपोहे विकत घेण्यासाठी सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांपासून तर झोपडपट्टीत राहणारे मजूर मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. विशेष म्हणजे, कांदेपोहे विकत घेतल्यानंतर त्यावर लागणारी तर्री ज्याला जेवढी पाहिजे असेल त्याने तेवढी घ्यायची, शिवाय सलाद मागितला तेवढा मिळत असे. हातठेला चालविणारा व्यक्तीही चांगल्या स्वभावाचा होता. त्याने कोणाला कोणत्या गोष्टीबद्दल हटकले असे कधीच झाले नाही. त्यामुळे तिथं नेहमीच गर्दी राहायची.

एमबीए शिकत असलेला त्याचा मुलगा सुट्टीच्या दिवशी हातठेल्यावर आला. वडिलांची दानशूर वृत्ती पाहून तो वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मी आपल्या भल्यासाठीच सांगतोय. सध्या बाजारात मंदीसदृश परिस्थिती सुरू आहे. आपण जे तर्री आणि सलादचं बेलगामपणे वाटप करता ते थांबवायला हवं. नाहीतर आपल्या या व्यवसायात भारी नुकसान होईल.’ मुलाचं म्हणणं वडिलांना पटलं. त्यामुळे त्यांनी सलाद, तर्री एक्स्ट्रा देणं तर बंद केलंच, शिवाय जेवढे पोहे ते आधी द्यायचे त्यातही कटौती केली.

गिऱ्हाईकांवर त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि हळूहळू लोकांची गर्दी कमी व्हायला लागली. सहा महिन्यांतच हातठेल्यावर येणारे लोक एवढे कमी झाले की दिवसाला एखाद-दोन गिऱ्हाईकच तिथे यायला लागले. मुलाचे सेमिस्टर संपले आणि पुन्हा तो परत आला आणि वडिलांना मदत करण्यासाठी हातठेल्यावर गेला. त्याला पाहताच वडील त्याला म्हणाले, ‘राजू, तू म्हणत होता तेच बरोबर होतं. मार्केटमध्ये मंदी आलीय. लोकांकडे कांदेपोहे खायलासुद्धा पैसे नाहीत.’

असंच प्रत्येकाचं आपलं तत्त्वज्ञान असतं. आपल्या उदारतेमुळे आणि कमी पैशात भरपूर मिळतं म्हणून गिऱ्हाईक हातठेल्यावर यायचे आणि आता एक्स्ट्रा देणं बंद केलं म्हणून गिऱ्हाईक कमी झालेत, यावर आत्मचिंतन न करता त्याने हातठेला न चालण्याचं खापर मंदीवर फोडलं. तसेच, ज्या मुलाच्या सल्ल्यामुळे दुकानाची वाट लागली तोच मुलगा आपल्याला योग्य मार्गदर्शन करीत होता, असं त्याला वाटलं. आपल्या मनाचं असंच असतं. जोपर्यंत आपण आपलं वस्तुनिष्ठपणे स्वयंमूल्यांकन आणि आत्मचिंतन करत नाही, तोपर्यंत आपल्याला वस्तुस्थिती तर कळत नाहीच, शिवाय चुकीचं मार्गदर्शन करणाऱ्यालाही आपण योग्यच ठरवतो. योग्य निर्णय घेण्यासाठी आत्मचिंतन आवश्यक आहे.

स्पर्धा परीक्षाथ्र्यांच्या बाबतीतही असंच | The Same Applies to Competitive Exam Aspirants

नियोजन नेमकं आणि नेटकं असेल तर स्पर्धा परीक्षेत सहजतेनं यश मिळविता येतं. मात्र येथेसुद्धा मार्गदर्शन करणाऱ्यांचं पेव फुटलं आहे. एकजण अमुक पुस्तकातून अभ्यास करण्याचा सल्ला देतो तर दुसरा वेगळंच काहीतरी सांगतो. सर्वांमध्ये एकाच बाबतीत सहमती असते ती म्हणजे, स्पर्धा परीक्षा फार अवघड असतात आणि त्या उत्तीर्ण करायला खूप मेहनत करावी लागते. कधी कधी तर तीन-चार वर्षे लागतात. तुम्हाला तसे लोकंही भेटतात. प्रत्यक्षात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमध्ये पहिल्याच प्रयत्नात आणि त्यातही कोणत्याही प्रकाराचे कोचिंग न लावता उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. मात्र त्यांचा आपल्याशी संपर्कच येत नाही. आपली खात्री पटवून घेण्यासाठी राज्य सरकारच्या कोणत्याही ऑफिसमध्ये जा आणि नवीन लागलेल्या कोणत्याही दहा कर्मचाऱ्यांना तुम्ही कोचिंग लावले होते का? अभ्यासिका ज्वाईन केली होती का? उत्तीर्ण व्हायला किती वर्षे लागलेत इत्यादी माहिती मिळवा. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

चूक होतेय कोठे? आत्मचिंतन का महत्त्वाचे? | Where are the Mistakes? Why is Self-Reflection Important?

आपण कोठे चुकतोय, हे आपल्याशिवाय दुसरा कोणीच सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता, मी पेपर छान सोडवला पण 15-20 प्रश्न माहिती असूनही चुकलेत. याचा अर्थ आपला अभ्यास कमी होता असं नव्हतंच तर कुठेतरी आपण यापैकी कोणतीतरी चूक केली होती. याच चुकांवर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

  1. वाचलेली पुस्तकं पूर्णपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असावीत.
  2. बेसिक कन्सेप्ट क्लीअर नव्हते.
  3. सोर्सेस जास्त होते आणि रिपिटेशन कमी.
  4. परीक्षेच्या एक आठवडा आधीपासून जी प्रॅक्टिस असायला हवी ती नव्हती.
  5. परीक्षेच्या वेळेपर्यंत नवनवीन माहिती मिळवणं सुरूच होतं.
  6. नियोजनाचा अभाव होता.

याशिवाय दुसरं कारण असू शकतं का? खरं तर हेच विद्याथ्र्यांना सुयोग्य पद्धतीने समजावून सांगण्यासाठी साप्ताहिकाच्या माध्यमातूनच आम्ही प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत सेमिनारचं आयोजन करत असतो. विद्याथ्र्यांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि सेमिनार करणाऱ्या विद्याथ्र्यांचं स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण होण्याचं प्रमाण उत्साह वाढवणारंच असतं. 12 वी नंतर प्रत्येक विद्याथ्र्यानं सेमिनार करावेत ही अपेक्षा असते. स्वयंमूल्यमापन आणि आत्मचिंतन हे यशाचे खरे मार्ग आहेत.

शुभम् भवतु!

Leave a Comment