आयुष्यात संकटं आल्याशिवाय आपल्याला प्रार्थना आणि कृतज्ञतेचं महत्त्व समजत नाही. तसेच लोकलाज सांभाळतांना आपण किती मोठ्या प्रमाणात आपल्या मनात गोंधळ करतो जो आपल्यासाठीच विनाशकारी ठरतो, याचंही भान आपण ठेवत नाही. हेच संस्कार मुलांवर केले जातात, जे त्यांच्या अपयशाची कारणं ठरतात. या लेखात आपण सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि अल्बर्ट एलिस यांच्या REBT (Rational Emotive Behavior Therapy) सिद्धांताच्या मदतीने आपल्या भावना आणि विचारांवर नियंत्रण कसे मिळवायचे हे पाहू.
जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवली तर जे आपल्याकडे नाही त्याही गोष्टी आपण आकर्षित करतो असं आकर्षणाचा नियम सांगतो. तसेच मानसशास्त्र सुद्धा कृतज्ञतेचे अनेक मानसिक फायदे सांगते. त्यामुळे जीवनात सकारात्मक विचार रुजवण्यासाठी कृतज्ञता खूप महत्त्वाची आहे.
कृतज्ञतेचे फायदे | Benefits of Gratitude
कृतज्ञतेचा सराव केल्याने मेंदूत सेरोटोनिन व डोपामिन हे आनंद निर्माण करणारे हार्मोन्स सक्रीय होतात. परिणामी, सतत तक्रार करणारी वृत्ती कमी होते आिण नकारात्मक भावनांच्या साखळीला ब्रेक बसतो.
याशिवाय, कृतज्ञ मनुष्य स्वत:ची तुलना करणं थांबवतो. त्यामुळं तो निराश होत नाही. कृतज्ञतेमुळे त्याच्यात आत्मविश्वास व आत्मसन्मान निर्माण होतो.
एवढेच नाही तर, कृतज्ञ व्यक्ती मानसिकरित्या शांत आिण समाधानी असतो.
मेंदूची ‘री-प्रोग्रामिंग’ करण्यात कृतज्ञता अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे जशा त्याला समस्या दिसतात, तशाच संधीसुद्धा दिसू लागतात. परिणामी, त्याची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आशादायी बनते.
थँक्यू म्हटल्याने, कौतुक केल्याने म्हणजेच कृतज्ञता व्यक्त केल्याने समोरच्या व्यक्तीसोबत भावनिक जवळीक निर्माण होते. यामुळे एकमेकांप्रती विश्वास निर्माण होतो.
मानसिक लवचिकता वाढते आणि ताठरतेला लगाम बसतो. तसेच, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, कारण कृतज्ञता तणाव कमी करते.
भावनेच्या कल्लोळाला प्रतिबंध लावण्याचं आिण विचारांना सकारात्मक ठेवण्याचं कार्य कृतज्ञता करते. म्हणून प्रत्येकाने निसर्ग, हवा, पाणी, स्वत:चं शरीर, शरीराच्या प्रत्येक अवयवांबद्दल दररोज कृतज्ञ असलं पाहिजे. ‘कृतज्ञता’ ही सुंदर आिण निरोगी आयुष्य निर्माण करण्याची किल्ली आहे.
निलाजरेपणा: लोक काय म्हणतील याची भीती | Boldness: Overcoming Fear of What People Will Say
आयुष्यात लाज, शरम वाटणाऱ्या गोष्टी घडतच असतात. परंतु, अभ्यासाची लाज किंवा रस्त्यावर पडलेला दगड उचलण्याची लाज अशा चांगल्या कामाचीही लाज वाटणं ही शुद्ध स्वत:शीच केलेली प्रतारणा होय. ‘लोकं काय म्हणतील’ या विचाराने माणूस असा कसा वागु शकतो की, ज्याला बुद्धी असूनही तो निर्बुद्ध असल्यासारखा वागतो आिण स्वत:चंच नुकसान करून घेतो.
अल्बर्ट एलिससारख्या मानसशास्त्रज्ञाला या भावनेच्या कल्लोळावर प्रचंड संशोधन करावं लागलं. तसेच, अल्बर्ट एलिस हे आधुनिक मानसशास्त्रातील अतिशय प्रभावी विचारवंत मानले जातात. त्यांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, अभ्यासातील भीती, अपयशाची धास्ती, आत्मविश्वासाची कमी आणि तणाव यांसारख्या अनेक भावनिक समस्यांवर उपाय सुचविले आहेत.
अल्बर्ट एलिस आणि REBT चे सिद्धांत | Albert Ellis and the Principles of REBT
एलिस म्हणतात की, आपल्या भावना आपल्या परिस्थितीमुळे नाही, तर त्या परिस्थितीबद्दल आपण आपल्या मनात जी समज तयार करतो त्यामुळे निर्माण होतात. म्हणूनच सकारात्मक विचार अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
एलिस पुढे असेही म्हणतात की, माणसाला त्रास हा घडत असलेल्या घटनांमुळे होत नाही, तर अतिशय अवास्तव आिण टोकाचे विचार त्रास देतात. उदाहरणार्थ, ‘मी परफेक्टच असायला हवं’, ‘लोकांनी मला पसंद करायलाच हवं’, ‘मी अपयशी झालो आता पुढं मला काहीच करता येण्यासारखं नाही’ किंवा ‘मी नापास झालो म्हणजे संपलं’ इत्यादी विचार आपल्याला अधिक दु:ख देतात.
महत्वाचे म्हणजे, एलिस यांनी संशोधन करून सिद्ध करून दाखवलं की मनुष्याच्या भावना या जन्मजात नसतात. त्या जशा घडवता येतात, तशाच त्या बदलवता सुद्धा येतात. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करावा; मात्र परफेक्ट असण्याचा हट्ट म्हणजे मानसिक आजाराची सुरूवात ठरते. त्यामुळेच, जीवनात चांगल्या गोष्टींसाठी निलाजरेपणा स्विकारणं गरजेचं असतं.
विचारांचे सामर्थ्य: REBT चे क्रांतिकारक सूत्र | The Power of Thoughts: REBT’s Revolutionary Formula
तुम्ही कधी विचार केला आहे का… एकाच परीक्षेत दोन विद्यार्थी बसतात. प्रश्नपत्रिका तीच असते, वेळ तीच असते, परिस्थिती तीच असते… पण एक आत्मविश्वासाने बाहेर येतो, तर दुसरा निराशेच्या गर्तेत जातो? याचे कारण म्हणजे, फरक प्रश्नपत्रिकेत नाही, तर आपल्या विचारप्रक्रियेत असतो.
म्हणून एलिस म्हणतात, ‘‘माणसाला वेदना घटना देत नाहीत, त्याबद्दल मनात तयार केलेली मतं देतात.’’ सकारात्मक विचार अंगीकारणे यासाठीच आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, नापास होणं दु:ख देत नाही, तर ‘आपण अपयशी आहोत’ हा विचार दु:खदायक ठरतो. तसेच, दुसऱ्यांनी टीका करणं वेदना देत नाही, तर ‘मला सर्वानीच मान्य केलं पाहिजे’ ही अपेक्षा वेदना देते.
यासाठीच, एलिस यांनी जगाला एक क्रांतिकारक सूत्र दिलं. तो म्हणजे Rational Emotive Behavior Therapy (REBT). REBT (Rational Emotive Behavior Therapy) हा एक शक्तिशाली मानसिक आरोग्य दृष्टिकोन आहे जो लोकांना अवास्तव आणि स्वयं-पराभूत विचार आणि भावना ओळखण्यास आणि बदलण्यास मदत करतो.
यामध्ये त्यांनी सिद्ध केलं की, विचार बदलले, की भावना बदलतात. भावना बदलल्या, की निर्णय बदलतात. आिण निर्णय बदलले, की आयुष्य बदलतं. म्हणूनच मनाचा प्रचंड वेग आणि सामर्थ्य ओळखून सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे.