सातत्य आणि एकाग्रता: यशाची गुरुकिल्ली | Consistency & Focus: Key to Success

संवाद: सातत्य आणि एकाग्रता यशाची गुरुकिल्ली | Dialogue: Consistency and Focus, the Key to Success

अचूकता, शक्ती, नियंत्रण आणि आत्मविश्वास हे गुण जीवनात आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे गुण केवळ एकदा प्रयत्न करून मिळत नाहीत, तर त्यांना सातत्याने (Consistency) आणि कठोर परिश्रमाने जोपासणे आवश्यक आहे. ब्रुस ली (Bruce Lee) यांनी म्हटले आहे, “I fear not the man who has practiced 10,000 kicks once, but I fear the man who has practiced one kick 10,000 times.” हे वाक्य सातत्य आणि सरावाचे महत्त्व अगदी स्पष्टपणे दर्शवते.

एखाद्या व्यक्तीने 10,000 किक्स एक-एकदा केल्या, तर त्यात भीतीचं कारण नाही. ते केवळ वरवरचं ज्ञान आहे. पण ज्याने एकच किक 10,000 वेळा प्रॅक्टिस केली असेल, तो त्या किकचा तज्ज्ञ बनतो. त्याच्यात अचूकता, शक्ती, नियंत्रण आणि आत्मविश्वास तयार होतो. ब्रुस ली हे जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट होते. त्यांची साधना, शिस्त आणि सातत्य जगभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या या वाक्याचा अर्थ केवळ मार्शल आर्टपुरता मर्यादित नाही तर तो अभ्यास, स्पर्धा परीक्षा, करिअर, आयुष्य अशा सर्व क्षेत्रांना लागू होतो.

सातत्य: यशाची गुरुकिल्ली | Consistency: The Key to Success

नेपोलियन बोनापार्ट (Napoleon Bonaparte) म्हणतो, “Victory belongs to the most Persevering,” म्हणजे, ‘‘विजय त्यांनाच मिळतो जे सर्वात जास्त सातत्य ठेवतात.’’ नेपोलियन बोनापार्ट हा इतिहासातील अतिशय वेगवान प्रगती करणारा, दूरदृष्टी असलेला आणि अपराजित राहण्याची जिद्द असलेला सेनानी होता. त्याच्या यशामागे त्याचे अदम्य सातत्य आणि कठोर परिश्रम होते. थोडक्यात, यशस्वी होणाऱ्या आणि अयशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा फरक त्यांच्यात असलेल्या क्षमता किंवा बुद्धिमत्तेचा नसतोच. तो असतो सातत्य आणि फक्त सातत्याचा. त्यामुळे, सातत्य राखणे हे यशासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.

लक्ष विचलित होणे आणि त्याचे परिणाम | Distraction and its Consequences

अलिकडे विद्यार्थी अभ्यासातील सातत्यच गमावून बसला आहे. ऑनलाईन माहिती फुकट मिळते म्हणून तो मोबाईलकडे वळला. त्याला माहितीचं भांडार मिळालं, पण त्यासोबत एकाग्रता भंग करणारी साधनंही मिळाली. यामुळे, ‘लक्षात राहत नाही’ अशी ओरड व्हायला लागली. 12-14 तास अभ्यासिकेत बसून अभ्यास केल्यावरही लक्षात राहत नाही. सराव प्रश्नपत्रिकेत गुण वाढत नाहीत, परिणामी निराशा वाढत चालली आहे. लेखी परीक्षेत यश मिळेल की नाही ही भीती कायमच अस्वस्थ करायला लागली, आणि आत्मविश्वास कमी व्हायला लागला.

वरवर पाहता, आनंदी दिसणारा चेहरा आतून मात्र पार पोखरल्या गेला. स्वतःला प्रेरणा देण्यासाठी त्याने पुन्हा मोबाईलकडेच धाव घेतली. मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं गायडन्स पाहून तो अधिक गोंधळला. स्वतःला सांभाळण्यासाठी त्यानं स्वतःवरच अनेक प्रयोग करून बघितले. परंतु त्यात सातत्य नव्हतं, ना स्थिरता. आज एक प्रयोग करून पाहायचा तर दुसऱ्या दिवशी दुसरा. या प्रकाराने तो अधिक गोंधळला आणि अधिक निराषेत ढकलल्या गेला.

एकाग्रता आणि नियंत्रणाचे महत्त्व | The Importance of Focus and Control

विद्यार्थी स्वतःच्या मनावरील नियंत्रण गमावून बसला आहे. खरं तर दोन तासात जेवढा अभ्यास होतो तेवढा आपण 14 तासात सुद्धा करू शकत नाही, याची जाणीव त्याला झाली आहे. त्याचं कारण मन एकाग्र होत नाही. याची जाणीव त्याला आहे, परंतु तो त्याची सवय सोडायला तयार नाही. आपण आपल्या दैनंदिन वागण्यात, अभ्यास करण्यात थोडासा बदल केला तरी चमत्कार घडू शकेल एवढा मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो, याची वेळोवेळी जाणीव होऊनही तो बदल करायला घाबरतोय, अक्षरशः घाबरतोय. एकाग्रता वाढवण्यासाठी योग्य सवयी आणि मानसिक नियंत्रण आवश्यक आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने: नवीन दिशा | Through Competition: A New Direction

पोलीस भरती प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक नवोदित तरुण साप्ताहिकाकडे वळले आहेत. ‘महिन्याला 60 रुपये खर्च करून तर बघू’ या विचाराने ते आले. मात्र एक-दोन अंकातील माहिती वाचूनच त्यांना कळायला लागलं की डिजिटल डिटॉक्स किती महत्त्वाचा आहे. जो या साप्ताहिकाच्या प्रेमात पडला तो कायमच साप्ताहिकाची आतुरतेने वाट बघत राहिला.

या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धा परीक्षेचीच माहिती देण्यात येणार नाही तर प्रत्येक विषयात आवड कशी निर्माण करायची, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, एकाग्रता वाढविण्यासाठी काय करायला हवं इत्यादींसोबतच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. अशाप्रकारे, हे साप्ताहिक विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सर्वांगीण विकासासाठी मदत करत आहे.

ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करा: सातत्याचे योगदान | Light the Flame of Knowledge: The Contribution of Consistency

“A Candle loses nothing by lighting another Candle.” सुप्रसिद्ध मानसतज्ज्ञ जेम्स केलर (James Keller) हे स्वतःचं मनस्वास्थ चांगलं, सुदृढ, प्रकाशमान होण्यासाठी जो मंत्र देतो, तोच आपल्याला आपल्या जीवनात उतरावायचा आहे. ‘‘एका दिव्याने दुसरा दिवा पेटविल्याने पहिल्या दिव्याला कोणतीच हानी पोहचत नाही. उलट आजूबाजूचा काळोख दूर होण्यास मदतच होते.’’ तसंच आपल्या ज्ञानाचं आहे.

तुम्ही या साप्ताहिकासाठी किमान एक वाचक जोडला तर तुमचं ज्ञान, तुमची प्रगती, तुमचं यश यापैकी काहीही कमी होणार नाही, उलट त्यात वाढच होईल. तुमच्या नि:स्वार्थ वृत्तीची, प्रेमळ स्वभावाची दखलच घेतली जाईल, जे तुमचा आत्मविश्वास तर वाढवेलच, तुमच्या अभ्यासालाही गती देईल. बघा, एवढीशी गोष्ट तुमची एकाग्रता वाढवेल. दुसऱ्याला प्रकाश देणारे माध्यम कधीच अंधारात चाचपडत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. ही ज्ञानाची ज्योत घराघरात पोहोचविण्यास मदत होईल. निकोप स्पर्धेला प्रोत्साहन मिळेल आणि त्यात तुमचं सातत्य (Consistency) आणि योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरेल.

ब्रुस ली यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, विकिपीडिया ला भेट द्या.

Leave a Comment