About

Sanjay Nathe

मुलाखत,शिक्षण,स्‍पर्धा परीक्षा व तत्‍सम विषयांवर  आधारित  सत्‍तरहून अधिक पुस्‍तकांचे लेखन

स्‍वातंत्र संग्राम नामनिर्देशित व अनेक स्‍पर्धा  परीक्षा उत्‍तीर्ण  करूनही नोकरी न करता स्‍पर्धा परीक्षण संस्‍था स्‍थापन  करून  स्‍वत मार्गदर्शक म्‍हणून  कार्यरत.

फावल्‍या  वेळेत वेळेचा सदुपयोग व्‍हावा म्‍हणून  व्‍यक्तिमत्‍व  विकासावरील आंतरराष्‍ट्रीय  लेखकांची पुस्‍तके वाचणे व स्‍वतच्‍याच रोजगार नोकरी संदर्भ ला संवाद लिहिणे सुरू केले.अशाच स्‍वत लिहिेलेल्‍या लेखांचा संग्रह म्‍हणजे  प्रेरक गोष्‍टी या पुस्‍तकाची रचना होय.

कोणतेही यश सहज मिळत नसले, तरी ते मिळवताच येत नाही, असे जगात काहीही नाही,यावर विश्‍वास.

अनुकूल परिस्थितीत योग्‍य निर्णय घेणे प्रत्‍येकालाच जमते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही जे योग्‍य निर्णय घेण्‍याची क्षमता विकसित करतात. ते उत्‍तम पुरूष समजावेत.

जे करायचे ते विचारपूर्वक ठरवा.एकदा ठरवले की मागे हटू नका.जे करायचे ते करून दाखवा.व्‍यर्थ बडबड करू नका.

जे काम मला स्‍वतलाच करायचे आहे, ते माहीत असूनही मी चालढकल करीत असेल, तर मी महामूर्ख आहे.

अडथळे आणि संकटे जितकी जास्‍त तितके यश अधिक, संकटांनीच मनुष्‍य बलवान बनतो आणि अडथळे त्‍याला अधिक पुष्‍ट बनवतात.

जो स्‍वतला सर्वात मोठा बुध्दिमान समजतो,संभवता त्‍याच्‍याएवढा मूर्ख तोच असतो. बुध्दिमान तर नम्र चिंतनशील आणि विदयार्थी असतो. तो निसर्गातील प्रत्‍येक बाबींकडून चांगले गुण शिकत असतो.