हवे आहे नव्हे, अत्यावश्यक आहे: यशाची गुरुकिल्ली | Not ‘Want’, but ‘Essential’: The Key to Success

आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी म्हणतो, “मला सरकारी नोकरी हवी आहे.” पण फार थोडेच विद्यार्थी म्हणतात, “मला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी रोज अभ्यास करणं अत्यावश्यक आहे.” हाच छोटासा फरक, यश आणि अपयश यांच्यामधली सर्वात मोठी दरी ठरवतो. जे विद्यार्थी अत्यावश्यक समजून कामाला लागतात ते यशस्वी होतातच! ‘हवे आहे’ म्हणजे इच्छा; ‘अत्यावश्यक आहे’ म्हणजे बांधिलकी.

“मला MPSC पास व्हायचं आहे”, “मला PSI व्हायचं आहे” ही फक्त इच्छा आहे. परंतु “मला रोज नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करणं अत्यावश्यक आहे”, “दर आठवड्याला ‘रोजगार नोकरी संदर्भ’ वाचणं आणि नोट्स तयार करणं अत्यावश्यक आहे,” ही बांधिलकी आहे. ‘हवे आहे’ हे मनात उमटणारं स्वप्न असतं, तर ‘अत्यावश्यक आहे’ हे त्या स्वप्नाला साकार करणारी कृती असते. त्यामुळे, आपल्या ध्येयाप्रती केवळ इच्छा न ठेवता, ती पूर्ण करण्यासाठी काय अत्यावश्यक आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

वाचन हीच खरी तयारी: ‘रोजगार नोकरी संदर्भ’चे महत्त्व

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित पुस्तक वाचणे आणि ‘रोजगार नोकरी संदर्भ’ साप्ताहिकाचं सातत्यपूर्ण अध्ययन, हे फक्त “हवं आहे” एवढं नाही, तर “अत्यावश्यक आहे,” यामध्ये मोडतं. या साप्ताहिकातून विद्यार्थ्यांना चालू घडामोडींची अचूक माहिती मिळते, त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन, संयम आणि प्रेरणेचे धडेही मिळतात. हे प्रत्येक विषयात आवड निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात. म्हणूनच हे साप्ताहिक म्हणजे फक्त माहितीचं साधन नाही, तर आत्मविश्वास, प्रेरणा आणि सातत्याची शिदोरी आहे.

शिवाय, केवळ वाचन पुरेसे नाही. वाचलेल्या गोष्टींवर विचार करणे आणि त्या आत्मसात करणे हे सुद्धा अत्यावश्यक आहे. अनेक विद्यार्थी फक्त वाचतात पण त्यावर चिंतन करत नाहीत. यामुळे माहितीची सखोल समज येत नाही. ‘रोजगार नोकरी संदर्भ’ वाचताना नोट्स काढणे, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे आणि त्यावर मित्रांशी चर्चा करणे हे यशासाठी महत्त्वाचे ठरते. याशिवाय, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे हे देखील अत्यावश्यक आहे.

स्पर्धा नव्हे, सह-प्रगतीचा मार्ग

विद्यार्थ्यांनी स्वतःपुरते मर्यादित न राहता आपल्या मित्रांनाही ‘रोजगार नोकरी संदर्भ’ वाचण्यासाठी प्रोत्साहित करावं. कारण एकत्र अभ्यास केल्याने चालू घडामोडींवर चर्चा होते आणि त्यामुळे “सकारात्मक स्पर्धा” (Healthy Competition) निर्माण होते. अशी स्पर्धा मागे खेचत नाही तर पुढे चालण्यास प्रवृत्त करते! प्रत्येक जण एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अनपेक्षितपणे अभ्यासाला प्रोत्साहन मिळतं, एकाग्रतेला चालना मिळते. या संदर्भात, यशासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा हा लेख देखील प्रेरणादायी ठरू शकतो.

आता कृती आवश्यक: संधी दाराशी

सध्या शासनाने विविध विभागांतील भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. एस.टी. महामंडळात तब्बल १७,४५० पदांची भरती अपेक्षित आहे, तर पोलीस भरतीच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. म्हणजेच संधी तुमच्या दाराशी आहे! आता जर अभ्यास फक्त ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यापुरता मर्यादित असेल, तर तो अर्धवट प्रयत्न ठरेल. नोट्स तयार करणं, वाचनाची सवय लावणं आणि नियमित साप्ताहिकाचं अध्ययन, हेच यशाचं खरं पायाभूत तत्त्व आहे. या संधींचा फायदा घेण्यासाठी तात्काळ कृती करणे अत्यावश्यक आहे.

शिवाय, परीक्षेच्या तयारीसाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. मानसिक दृढता आणि सकारात्मक दृष्टिकोन असणेही अत्यावश्यक आहे. मानसिक दृढता या विषयावर अधिक माहितीसाठी आमचा ब्लॉग वाचा.

‘हवे आहे’ बदलून ‘अत्यावश्यक आहे’ करा

“हवे आहे” म्हणणारा विद्यार्थी मिळालेली संधी सुद्धा योग्य पद्धतीने उपयोगात आणू शकत नाही. कारण त्यानं आपल्या आधीच बनलेल्या धारणा कायम ठेवलेल्या असतात. त्यात त्याला बदल नको असतो. पण “अत्यावश्यक आहे” म्हणणारा विद्यार्थी संधीचं सोने कसं करता येईल याचं नियोजन करतो. तो रिस्क घेत नाही. तो स्वतःला कायम प्रेरित आणि सकारात्मक ठेवण्याचे मार्ग शोधून त्यावर लगेच अंमलबजावणी करतो. ज्याचं ध्येय ठरतं आणि त्याच्यासाठी ते अत्यावश्यक होतं, अशा विद्यार्थ्यांच्या वाटेत अडथळे आले तरी तो थांबत नाही.

जेव्हा आपण ‘हवे आहे’ याला ‘अत्यावश्यक आहे’ मध्ये बदलतो, तेव्हा यश आपल्यामागे धावू लागतं. हेच यशाचे खरे गुपित आहे, जसे की यशाचे गुपित या आमच्या लेखात सविस्तर सांगितले आहे. ही बदललेली मानसिकता आणि कृती करण्याची तयारीच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेते.

‘रोजगार नोकरी संदर्भ’ हे फक्त एक साप्ताहिक नाही, तर ते विद्यार्थ्यांच्या मनातील “इच्छे”ला “कर्तव्य” बनवण्याची ताकद देणारं साधन आहे. ते नियमित वाचा, आत्मसात करा आणि आपल्या यशाच्या प्रवासाची सुरुवात आजच करा!

Leave a Comment