यशासाठी शिस्त: एलिउड किपचोगे यांच्या प्रेरणेतून | Discipline for Success: Inspired by Eliud Kipchoge

आपल्या वागण्या-बोलण्यात शिस्त नसेल तर तुम्ही विखुरलेले असता. पदोपदी आळस आडवा येतो. टोलवाटोलवी तर पाचवीला पुजलेली असते. मात्र शिस्तीने काम करणाऱ्याला जबाबदारीचे आणि वेळेचं भान असतं. त्यामुळेच अशी माणसं जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवतात. स्पर्धा परीक्षाथ्र्यांनी जर यशासाठी शिस्त अंगी बाळगली तर यश मिळवणं अवघड जात नाही. हीच यशासाठी शिस्त तुम्हाला ध्येय गाठायला मदत करते.

एलिउड किपचोगे: शिस्तीचे प्रतीक (Eliud Kipchoge: Symbol of Discipline)

‘‘तुमचं वातावरण महान असायला नको, तुमची वृत्ती महान असायला हवी. Only the disciplined ones in life are free.” – एलिउड किपचोगे.

कोण आहे हा किपचोगे? तो आहे जगातील सर्वोच्च धावपटू. दोन तासांच्या आत मॅरेथॉन स्पर्धा पार करणारा तो जगातील पहिला व्यक्ती आहे. मात्र त्याची खरी जादू त्याच्या धावण्यात नव्हे, तर ‘मन जिंकलं की जग जिंकता येतं,’ हे साधं वाक्य जीवनात अंगीकारण्यात आहे. हेच मनाचे सामर्थ्‍य तो दाखवतो.

स्वतःशीच स्पर्धा आणि मानसिक दृढता (Compete with Yourself and Mental Fortitude)

एलिउड किपचोगेचं संपूर्ण आयुष्य एका साध्या खोलीत, अत्यंत साधारण परिस्थितीत, साध्या अन्नावर, केनियाच्या एका छोट्याशा गावात लहानपणापासून सायकल चालवत पाणी विकून उदरनिर्वाह करण्यात गेलं. परंतु, त्याचं रूटीन अत्यंत नियोजनबद्ध असायचं. त्याचा दिनक्रम इतरांसारखा अस्ताव्यस्त नव्हता. म्हणूनच तो जगप्रसिद्ध झाला.

तो कधीच इतर धावपटूंसोबत तुलना करत नाही, कारण त्याला माहित आहे की खरी स्पर्धा स्वतःशीच असते. तो म्हणतो, ‘‘मी काल जिथे थांबलो होतो, आज त्याहून एक पाऊल पुढे टाकायचं. “Don’t race against others, race against your own limits.” मन जिंकण्यासाठी जी साधना लागते ती त्याच्याकडे होती. म्हणूनच त्याचं शरीर थकलं तरी त्यानं मनाला थकू दिलं नाही.

आज तो जगप्रसिद्ध आहे आणि राष्ट्राध्यक्ष त्याला सलाम करतात. तरीही, तो यशानं हुरळून गेला नाही. तो अजूनही गावातल्या छोट्या खोलीत झोपतो. शिवाय, सहकारी धावपटूंना नि:शुल्क प्रशिक्षण देतो आणि त्यांना स्वत: जेवण वाढतो. हेच त्याच्या साधेपणाचे आणि यशासाठी शिस्त बाळगण्याचे उत्तम उदाहरण आहे.

शिस्तीचे अनुकरण: स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा (Emulating Discipline: Inspiration for Competitive Exams)

काहींचं जीवन असं अनुकरणीय असतं. ते यशातही संयम ठेवण्याची, सातत्यानं कृती करण्याची आणि जीवनात यशस्वी होण्याची कायमच प्रेरणा देतं. म्हणूनच, स्पर्धा परीक्षाथ्र्यांनी अशा गोष्टीपासून प्रेरणा घ्यायला हवी. कारण स्पर्धा परीक्षा ही केवळ एका सरकारी नोकरीसाठीची स्पर्धा नाही, तर ती एका तरुणाच्या स्वप्नांची, त्याच्या कुटुंबाच्या अपेक्षांची आणि समाजाच्या बदलासाठी निर्माण झालेल्या इच्छाशक्तीची परीक्षा असते.

लाखो विद्यार्थी या स्पर्धेत असतात. परंतु, तेच यशस्वी होतात जे किपचोगेसारख्या महान व्यक्तींच्या जीवनातील चांगल्या गुणांचं अनुकरण करतात. हे गुण यशासाठी शिस्त शिकवतात.

यशासाठी शिस्त कशी बाळगावी? (How to Cultivate Discipline for Success?)

सुरुवातीला अनेक अडचणी येतील, पण स्वत:चा आत्मविश्वास टिकवणं फार गरजेचं असतं. म्हणूनच, ‘मी हे करू शकतो’ या विचारातून यशाची सुरुवात करा. यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करा:

  1. शिस्तबद्ध अभ्यास पद्धतीचा स्वीकार करा. आपल्याला मिळालेल्या अमूल्य वेळेचं नियोजन करा. अभ्यासक्रमाचं विषयानुरूप विभाजन करून, वेळेचं व्यवस्थापन करून त्यावर कठोरतेने अंमलबजावणी करा. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल.
  2. योग्य मार्गदर्शन घ्या. प्रश्न विचारायला संकोच करू नका. रोजगार नोकरी संदर्भ, यशस्वी विद्यार्थी यांच्याकडून मार्गदर्शन मिळवा. लक्षात घ्या, अभ्यासाची दिशा चुकली तर मेहनत वाया जाते.
  3. मन आणि शरीर निरोगी ठेवा. ध्यान, व्यायाम आणि योगाभ्यासाने मानसिक स्थैर्य मिळवा. आवश्यक तेवढी झोप घ्या. मोबाईल, सोशल मीडिया यांपासून स्वत:ला दूर ठेवा. निरोगी जीवनशैली ही यशाची गुरुकिल्ली आहे.
  4. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करा. महान व्यक्तींचं जीवन एक मार्गदर्शकाचं काम तर करतंच, शिवाय ते तुम्हाला प्रेरणाही देतं. कोण्याही परिस्थितीत हार न मानण्याची, जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कठोर प्रयत्नांची प्रेरणा तुम्हाला अंत:प्रेरणा देईल.

अपयश: यशाच्या मार्गातील एक टप्पा (Failure: A Stepping Stone to Success)

एखाद्या परीक्षेत अपयश मिळणं म्हणजे तुमचं आयुष्य संपलेलं नाही. याउलट, याचा फक्त इतकाच अर्थ असतो की, ‘अजून तयारी करण्याची गरज आहे.’ हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

अपयश मिळणं हे तुम्हाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतं. ‘मी कुठे कमी पडलो?’ याचं शांतपणे विश्लेषण करा. स्वत:च्या चुका ओळखणं हीच सुधारणा सुरू करण्याची पहिली पायरी आहे.

सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा. तुमचं स्वप्न मोठं आहे आणि ते गाठण्याचं तुम्ही धाडस केलं याचा अभिमान बाळगा. शिवाय, स्पर्धा परीक्षेतील अपयशही तुम्हाला बरंच काही शिकवून जातं. यामुळे तुमचा जीवनाकडे, समाजाकडे, व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून स्वत:च्या अंतर्मनाचा स्वत:च आरसा बना आणि स्वत:ला आनंदी, निरोगी आणि यशस्वी झालेलं प्रतिबिंब बघा. यशासाठी शिस्त तुम्हाला या प्रवासात साथ देईल.

Leave a Comment