आंतरराष्ट्रीय सहकार्य: शाश्वत विकासाचे नवे वर्ष (2025-2026) | International Cooperation: New Era of Sustainable Development

भविष्यातील जग हे स्पर्धेवर नव्हे, तर सहकार्यावर उभं राहणार आहे असं युनो चं म्हणणं आहे. म्हणूनच युनोनं 2025 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून घोषित केले होते. तसेच, 2026 हे वर्ष तीन अत्यंत महत्त्वाच्या विषयांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. खरं तर, ही घोषणा जर प्रत्यक्षात आली तर जगात शांतता तर नांदेलच, शिवाय या जगात कोणीच उपाशी झोपणार नाही. हे आंतरराष्ट्रीय सहकार्य खरंच जगाला बदलू शकते.

युक्त राष्ट्रसंघाची मुख्य इमारत ज्या ठिकाणी उभी आहे ती जागा जॉन डी. रॉकफेलर या जगातील ऑईल कंपनीवर एकाधिकार असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्याने दानात दिली आहे. आज त्यांची चौथी पिढी अस्तित्वात आहे. त्याच रॉकफेलरच्या पावलांवर पाऊल टाकून भारतात धीरूभाई अंबानीने आपले साम्राज्य उभे केले. कायदे करणाऱ्या सरकारला कसं नाचवायचं, बाजारावर नियंत्रण कसं मिळवायचं आणि श्रीमंतांपासून तर गरिबांपर्यंत प्रत्येकाकडून एकाधिकारशाहीने पैसे कसे काढायचे हे रॉकफेलर नावाच्या तेल व्यापाऱ्याने जगातील मोठ-मोठ्या कंपन्यांना शिकवले. आज त्याचीच नक्कल जगभरात सुरू आहे.

जन-झी आणि सहकार्याचे आव्हान | Gen-Z and the Challenge of Cooperation

मात्र जेन-झी नावाची नवीच संस्कृती सध्या उदयाला आली असून, जर एकाधिकाराशाहीने बेरोजगारीत वाढ झाली, लोकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली तर काय होईल? गरिबांचे आर्थिक शोषण व्हायला लागले आणि जनतेकडे कोणतेच पर्याय राहिले नाहीत तर कोणत्याही देशाचा बांग्लादेश, नेपाळ होऊ शकतो हे तेथील जेन-झी आंदोलनाने दाखवून दिले. श्रीमंतांबद्दलचा द्वेष कमालिचे टोक गाठु शकतो हेच अर्थतज्ज्ञ जगातील राजकीय नेत्यांना बजावत आहेत. ते ठसविण्यासाठी प्रत्येक वर्ष हे सहकार्यावर आधारित राहील असे घोषित करत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक महत्त्वाचे ठरते.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (2025) | International Year of Cooperation (2025)

सहकार म्हणजे एकत्र येवून पुढे जाणे. याच आधारावर युनो ने 2025 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून घोषित केले होते. या माध्यमातून सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व, आर्थिक समावेशन, ग्रामीण व शहरी विकास आणि श्रमाला प्रतिष्ठा या मूल्यांची जपवणूक करण्यासाठी युनो ने मोठे अभियान राबविले. तथापि, अनेक देशात फक्त कागदी घोडे तेवढे नाचत आहेत. भारताचंच उदाहरण घ्या ना! सरकार चळवळीचं रूपच पालटवून टाकलं. जमिनीवरची हकीकत न समजून घेता कायदे केल्या जात आहेत.

ज्या पतसंस्था सहजतेनं कर्ज देऊ शकत होत्या त्याही अशा पद्धतीने कायद्याच्या कचाट्यात बांधल्यात की, गरीब, कर्जबाजारी शेतकऱ्यांचा शेवटचा मार्गही बंद करून टाकला. परिणामी, त्याच्याकडे सावकाराकडे जाण्याशिवाय आणि सावकारी पाशातून निघता येत नाही म्हणून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहीला नाही. आर्थिक निरक्षरता, प्रादेशिक समाजव्यवस्था समजून न घेता राबविण्यात आलेली ही पांढरपेशी आर्थिक व्यवस्था गरिबांना झेपणारी नाही. हे सरकारलाही कळतं. म्हणूनच त्यांना मोफत अन्नधान्य, शेतकरी सन्मानाच्या आणि लाडकी बहीण इत्यादींद्वारा मोफत पैसे वाटप सुरू आहे. हे स्वयंपूर्णतेचे लक्षण नसून गरिबांच्या आत्मसन्मानाशी खेळ आहे. एक दिवस याचा स्फोट होणारच. यावर उपाय म्हणून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे.

युनोच्या तीन जागतिक संकल्पना (2026) | UN’s Three Global Concepts (2026)

युनो ने 2026 साठी खालील तीन आंतरराष्ट्रीय वर्षे घोषित केली आहेत:

  1. महिला शेतकरी आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year of Women Farmers)
  2. रेंजलँड्स आणि पशुपालन वर्ष (International Year of Rangelands and Pastoralists)
  3. शाश्वत विकासासाठी स्वयंसेवक आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year of Volunteers for Sustainable Development)

या तिन्ही योजना सामान्य मनुष्याच्या श्रमाला, सहकार्याला आणि निसर्गाशी सुसंवादाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आहेत. या संकल्पना खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवतील.

महिला शेतकरी: विकासाचा आधार | Women Farmers: Pillars of Development

भारतातच नव्हे तर जगभरात शेतीच्या कामात महिलांचा वाटा मोठा आहे. तथापि, निर्णयप्रक्रीया, जमीनहक्क, तंत्रज्ञान आणि आर्थिक साधनांमध्ये त्या मागे पडतात. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करणं म्हणजे:

  • महिलांच्या श्रमाला जागतिक मान्यता देणे
  • कृषी धोरणांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण करणे

महिलांच्या सक्रिय सहभागाशिवाय शाश्वत विकास शक्य नाही, म्हणूनच हे वर्ष महत्त्वाचे आहे.

पशुपालन आणि रेंजलँड्स: निसर्गाशी सुसंवाद | Pastoralism & Rangelands: Harmony with Nature

पशुपालन आणि रेंजलँड्सवर जगाची मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. हे समुदाय:

  • पर्यावरण संतुलन राखतात
  • पारंपारिक ज्ञान जपतात
  • हवामान बदलाशी नैसर्गिकरित्या जुळवून घेतात

2026 मधील ही घोषणा म्हणजे, ‘विकास म्हणजे निसर्गाचा ऱ्हास नव्हे, तर निसर्गासोबतचा विकास’ असा स्पष्ट संदेश आहे. हे निसर्गासोबतचे आंतरराष्ट्रीय सहकार्य दर्शवते.

स्वयंसेवक: शाश्वत विकासाचे इंजिन | Volunteers: Engine of Sustainable Development

सरकारची धोरणं, त्यांच्याकडून मिळणारा निधी यापेक्षाही समाजावर परिणाम करणारा घटक म्हणजे ‘स्वयंसेवक’ होय. 2026 हे स्वयंसेवकांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष जाहीर करणं म्हणजे:

  • युवकांच्या सामाजिक सहभागाला चालना (सकारात्मक दृष्टिकोन वाढवून)
  • नोकरीबरोबरच समाजासाठी योगदान देण्याची जाणीव निर्माण करणे

थोडक्यात, सहकाराशिवाय शाश्वत रोजगार नाही. महिलांच्या सहभागाशिवाय समृद्ध अर्थव्यवस्था नाही. स्वयंसेवकांशिवाय सामाजिक परिवर्तन नाही आणि निसर्गाशी सुसंवादाशिवाय टिकाऊ विकास नाही. हे सर्व घटक आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करतात.

आमची भूमिका आणि प्रेरणा | Our Role and Inspiration

‘डोळस’ कृतिशील आणि समाजविकासाला स्वत:च्या विकासाएढाच महत्त्व देणारा सुजाण नागरिक निर्माण करणे हाच रोजगार नोकरी संदर्भाचा प्रयत्न राहिला आहे. म्हणूनच मुंबईचे ईश्वर धाकतोडे यांची प्रतिक्रीया आम्हाला अधिक जबाबदार बनवते. ते म्हणतात, ‘या साप्ताहिकाने मला जगण्याची नवी दृष्टी दिली. प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा दिली. समन्वयातून विकास करण्याचा दृष्टीकोन विकसित केला’. अशीच एक प्रतिक्रिया सैन्यदलातील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ते म्हणतात, ‘चहापाण्यावर सहजतेने 15-20 रुपये खर्च करणारा तरुण हे साप्ताहिक घराघरात पोहोचावे म्हणून चळवळ का उभारत नाही’ !

येथे वाया जाईल असं काहीही नाही. प्रत्येकाला मानसिकरित्या समृद्ध करेल अशीच माहिती या साप्ताहिकात देण्यात येते. स्पर्धा परीक्षेच्या माहितीसोबतच सकारात्मक जीवन जगण्याचे धडे दिले जातात. (मानसिक दृढता वाढवण्यासाठी.) होणारा फायदाच असतो, नुकसान काहीही नाही. विशेष म्हणजे तरुण मनावर नकारात्मकता ठसविणारे लेखन नसते. जे आहे ते सकारात्मक आणि सहकार्याची विनंती करणारे नम्र निवेदन. नवीन वर्ष सर्व तरुणांना रोजगार मिळवून देणारे जावो, हीच शुभकामना! सकारात्मक विचारांनी आपण जगामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवू शकतो.

Leave a Comment