सक्षमता आणि मूल्यांकन: यशाची गुरुकिल्ली | Competence & Evaluation: Key to Success

सकारात्मकता ही प्रकाशासारखी असते, त्याचा एक लहानसा किरणच नकारात्मकतेचा अंधकार नाहीसा करण्यासाठी पुरेसा असतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्थित ‘सकारात्मक भावना आणि शरीरविज्ञानशास्त्र’ लॅबच्या प्रमुख संशोधक प्रो. बारबरा फ्रेड्रिक्सन यांचे मत आहे. तुम्हाला जे हवं ते आधीच अस्तित्वात आहे, परंतु ते पचवण्याची, ग्रहण करण्याची तुमची सक्षमता आणि मूल्यांकन करण्याची दृष्टी निर्माण होणे महत्त्वाचे आहे. वैज्ञानिकांना आपल्या अभ्यासात असे आढळले आहे की, सकारात्मक राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त ऊर्जा आणि कामाप्रति उत्साह असतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आणि खासगी जीवनात कमालीची लवचिकता असते. सकारात्मक विचारांमुळे नवीन माहिती ग्रहण करणाऱ्या लोकांमध्ये कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचं अद्भुत कौशल्य असतं. त्यांची विद्वत्ता सामान्य मनुष्याच्या आकलनापलीकडे असते.

‘जे काही आपलं आहे, ते आपल्याजवळ तेव्हाच पोहचतं, जेव्हा आपण ते ग्रहण करण्यास सक्षम असतो.’ – रवींद्रनाथ टागोर.

विद्वत्ता सर्वत्र पूज्यते: खऱ्या ज्ञानाचे महत्त्व

‘स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते.’ विद्वत्ता आणि राजवैभव या दोहोंची कुठेच तुलना होऊ शकत नाही. राजाला केवळ आपल्या राज्यात सन्मान मिळतो, मात्र विद्वानाचा सन्मान सर्वीकडेच होतो. राजेशाही परंपरेने मिळू शकते, ज्ञानाचं तसं नसतं. ज्ञानी व्यक्ती एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे असतो, तो जिथे उभा राहतो तेथील वातावरण प्रकाशमय होऊन जाते. तिथे ज्ञानाचा सुगंध दरवळायला लागतो. ज्ञानी व्यक्ती जुनाट परंपरेला जुमानत नाही. शिवाय, जे जनकल्याणासाठी योग्य असेल ते प्रवाहाविरुद्ध का असेना ते करण्यास त्यांना संकोच वाटत नाही. वैयक्तिक स्वार्थ, हितसंबंध यापासून ते दूर राहतात. तरीही त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. खऱ्या अर्थाने, ज्ञानामुळेच व्यक्तीची खरी क्षमता सिद्ध होते आणि त्याचे योग्य मूल्यांकन होते.

भारतीय ज्ञानपुरुष: मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि सक्षमता

एकदा रेल्वेच्या डब्यात इंग्रजांसोबत एक भारतीय व्यक्तीसुद्धा प्रवास करीत होता. त्याची साधी राहणी पाहून इंग्रज प्रवासी हसत होते. ते मात्र शांत बसले होते, जसे त्याचं लक्ष कुठल्यातरी गोष्टीवर केंद्रित होते. अचानक ते उठले आणि ‘रेल्वे थांबवा, रेल्वे थांबवा’ असे ओरडले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी रेल्वेची चेन ओढली. त्यांच्या अशा वागण्याने इंग्रज यात्री भडकले. ‘तुमचं डोकं फिरलं का?’ एकाने रागात येऊन विचारले.

तेवढ्यात टीसी आला. त्याने चेन ओढण्याचे कारण विचारले. त्या व्यक्तीने शांततेनं उत्तर दिले, ‘मी मुद्दामहून चेन ओढली नाही. येथे काही अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले आहेत. रेल्वे थांबली नसती तर हजारो लोकांचे प्राण गेले असते.’ लगेच धावपळ सुरू झाली. खरोखरच काही अंतरावर रेल्वेचे रूळ उखडलेले होते. ते पाहून इंग्रज हैराण झाले. त्यांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं, ‘तुम्हाला कसं कळलं?’ तो भारतीय व्यक्ती म्हणाला, ‘माझं लक्ष गाडीच्या वेगावर आणि रुळातून निघणाऱ्या कंपनांवर होतं. गाडीचा वेग कमी होणं आणि कंपनांमध्ये बदल होणं हे रूळ उखडण्याचंच कारण असू शकतं.’

ते भारतीय व्यक्ती मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या होते. ज्यांच्या साध्या राहणीमानावरून इंग्रज हसत होते. म्हणजेच कपड्यांवरून कोणाचेच मूल्यांकन होऊ शकत नाही, तर त्याच्या कृती आणि विचारांवरून होते. ज्ञानी व्यक्तीची ओळख सामान्यांना होणं कठीणच. एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस १५ सप्टेंबर ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताव्यतिरिक्त श्रीलंका आणि टांझानियामध्येसुद्धा १५ सप्टेंबर हा दिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यांची ही दूरदृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी, आपण मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या विकिपीडिया पानाला भेट देऊ शकता.

कल्पक दृष्टिकोन: यशाची प्रेरणा आणि योग्य सक्षमता

सामान्यांचा सामान्य दृष्टिकोन असतो. त्यांची दृष्टी ‘स्वयं’च्या पुढे जात नाही. ते स्वतःच्याच विचारात एवढे गुंतलेले असतात की त्यांच्यासमोर त्यांना सर्व थिटं वाटतं. स्वार्थासाठी आणि स्वानंदासाठी केलेल्या कार्याचीही प्रशंसा व्हावी एवढा संकुचित विचार त्यांचा असतो. मात्र ज्ञानी व्यक्तीचे तसे नसते. सन्मान, प्रशंसा त्यांच्यामागे धावते. त्यांच्या विचारांची कल्पकता नवनिर्मितीचा ध्यास घेणारी असते. म्हणून, स्पर्धा परीक्षाथ्र्यांनी अशा महनीय व्यक्तीकडून प्रेरणा घेतल्यास त्यांचा संपूर्ण प्रवासच सुखकर होईल, याची खात्री आहे. यातूनच त्यांची खरी ध्येय निश्चिती आणि सक्षमता अधिक प्रभावी होते.

Leave a Comment